न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जुलै. २०२०) :- महापालिकेत संभाजी ऐवले यांना पदोन्नति देण्यात दिरंगाई होत असल्याबाबत मनसेचे राजू भालेराव यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत विभागाकडे सदर पत्र पाठविले आहे.
ऐवले हे पिंपरी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदाकरिता निर्धारित करण्यात आलेली अर्हता धारण करित आहेत. विधि समितीच्या २०१९ च्या विषय समितीमध्ये व जानेवारी २०२० च्या मनपा सभेमध्ये देखिल पदोन्नति देण्याचा ठराव मंजूर केला आहे. मात्र सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही पदोन्नति दिलेली नाही.
विषयाबाबत मनसेचे राजू भालेराव यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दि. २५ जुलै रोजी पत्र पाठवले. त्यात मनपा प्रशासन तसेच आयुक्त पदोन्नती देण्यास दिरंगाई करीत असल्याचे नमूद केले आहे.


















