न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. २७ जुलै) रोजी ९८१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील ८ आणि हद्दीबाहेरील २ अशा १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात सांगवी (पुरुष ७५ वर्षे), यमुनानगर (पुरुष ८८ वर्षे), पिंपरी (पुरुष ५० वर्षे, पुरुष ४८ वर्षे), भोसरी (पुरुष २६ वर्षे), मोशी (पुरुष ९४ वर्षे, पुरुष ३६ वर्षे), थेरगांव (पुरुष ७६ वर्षे), मुळशी (पुरुष ६६ वर्षे), येरवडा (स्त्री ४८ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १७२६४ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ३४५१ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण २९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ११५३० वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















