न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. जुलै. २०२०) :- कारमधून कंपनीतून घरी निघालेल्या तळेगाव एमआयडीसीतील डाॅन्गशिन कंपनीतील एका अधिकाऱ्यावर दोन मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हॉकीस्टिकने हल्ला केला. विशाल लॉन्स समोर त्यांच्या कारला मोटारसायकलने पाठीमागून धडक दिली.
त्यांच्या पायावर हॉकीस्टिकने हल्ला केला. पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. ही घटना गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मुथन्ना के. सुबय्या (वय ५७, रा. टाटा हाऊसिंग सोसायटी, वडगाव मावळ) असे हल्ला झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. वडगाव पोलीस तपास करीत आहेत.