न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. ऑगस्ट. २०२०) :- अनवधानाने शाळा आवारात विक्रेत्याला पुस्तक विक्रीस सहमती दिल्याने शिक्षण मंडळाने केलेली कारवाई योग्य आहे. मात्र, आरटीआय कार्यकर्त्याची तक्रार आणि वागणूक चुकीची होती. इथूनपुढे नियमबाह्य कुठलीही ल्याही साहित्य विक्री येथे होणार नाही, असे स्पष्टीकरण द गुड समॅरिटन शाळेने पत्रकार परिषदेत शुक्रवारी (दि ३१) दिली.
शाळा पालकांना फी साठी तगादा लावत असून शाळेत पुस्तक विक्री सुरू आहे. खरेदीसाठी पालकांना सक्ती केली जात असल्याची तक्रार एकाने महापालिकेच्या शिक्षण मंडळाला केल्याने मंगळवारी येथे कारवाई करीत पुस्तके ठेवण्यात आलेल्या दोन वर्ग खोल्या सील करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आपली बाजू मांडण्यासाठी शाळेने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. परीषदेला मुख्याध्यापक आशिष गायकवाड, पर्यवेक्षिका डॉ निकिता गायकवाड, पालक प्रतिनिधी शोभा चव्हाण, माजी विद्यार्थी व नगरसेवक सचिन भोसले, शैलेश देशमुख यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते.
पालक आणि शाळा प्रशासनात उत्तम समन्वय आहे. कोरोनामुळे पालकांच्या विनंती वरून आम्ही येथे विक्रेत्याला जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र कुठल्याही पालकांना पुस्तक खरेदीसाठी तगादा लावला नाही. १-२ पालकांच्या गैरसमजुतीतून हा सर्व प्रकार झाला आहे. मात्र, त्यांचाही गैरसमज आम्ही दूर करू. मात्र, आरटीआय कार्यकर्त्याने पालक नसताना पालक म्हणून खोटी तक्रार केली. शाळा आवारात येऊन शिक्षकांसोबत उद्धट वर्तन केले. याचा आम्ही निषेध करतो.