न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. ऑगस्ट. २०२०) :- पिंपळे गुरव परिसरातील सुवर्ण पार्क परिसरात असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मशीनच्या स्कीमरमध्ये (कार्ड स्वॅप करतो ती जागा) एक चिप बसवण्यात आली होती. पिन नंबर टाकतो तिथेदेखील वर एक छिद्र पाडून छुपा कॅमेरा बसवण्यात आला होता.
पैसे काढणाऱ्या व्यक्तीने पिन टाकताच तो पिन कॅमेऱ्यात कैद होत होता. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित घटनेचा पर्दाफाश केला. परंतू, चिप आणि कॅमेरा कधी लावला गेला आणि किती जणांचा डेटा चोरला गेला असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.