- डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमणुकीचा प्रस्ताव स्थायीपुढे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. ऑगस्ट. २०२०) :- वायससीएम रुग्णालय हे कोरोनाच्या रुग्णांसाठी समर्पित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी रूग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रूग्णांच्या नातेवाइकांकडून आणि नगरसेवकाकडून शिवीगाळ व दमदाटी करण्याचा प्रकार घडला होता. पुन्हा डॉक्टरांना धक्काबुक्की, शिवीगाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळावी यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.
पुढील दोन महिन्यांसाठी कंत्राटी स्वरूपात सुरक्षा रक्षक घेण्यात येणार आहे. स्थायी समितीने मान्यता दिल्यास ही सुरक्षा देण्यात येणार आहे. सहा लाख रूपयांचा हा प्रस्ताव आहे. एका पाळीत महिला सुरक्षा रक्षक व ३ पुरुष सुरक्षा रक्षक असणार आहेत. असे तिन्ही पाळीत एकुण बारा सुरक्षा रक्षक असणार आहेत. प्रत्येक सुरक्षा रक्षकाला २५००० रूपये मानधन देण्यात येणार आहे.