न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. ऑगस्ट. २०२०) :- राखी हे विश्वासाचं प्रतिक, हाच विश्वास मनात ठेवून पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने शहरात डाॅक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, पोलिस व सर्व कोरोना योद्धांसोबत रक्षाबंधन साजरा केला व वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.
यात शहर राष्ट्रवादी युवती अध्यक्षा वर्षा जगताप, ऋतुजा, श्वेता, फातिमा, ज्योती, शलाका, हिना, स्नेहल आणि सोनाली सहभागी झाल्या होत्या.