न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट. २०२०) :- ‘तू माझ्यासोबत बोलत नाही म्हणून मी आत्महत्या करेल, अशी धमकी देत एका तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार १ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान डेअरी फार्म, पिंपरी येथे घडला. तसेच तरुणीचा मोबाइलही पळवून नेला.
याप्रकरणी तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषिकेश राजू दिवर (वय २१, रा. कैलासनगर, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी तरुणीचा पाठलाग करत होता.
आरोपीने फोन करून आत्महत्या करण्याची व लग्न न केल्यास तुझ्या भावाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. तरुणीला शिवीगाळ करून तिच्याकडील मोबाइल फोन जबरदस्तीने पळवून नेला.