न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. ऑगस्ट. २०२०) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राममंदिर उभारणीच्या भूमिपूजन सोहळ्याला मंत्रोच्चाराच्या गजरात सुरूवात करण्यात आली. तसेच अवघ्या तासाभरात हा भूमिपूजन सोहळा पार पडला.
यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित आहेत. यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं.
सर्व आमंत्रित पाहुणे सोहळ्याला उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव अयोध्या सील करण्यात आली. श्रीराम मंदिराच्या ट्रस्टकडून एकूण १७५ जणांना भूमिपूजनाचं निमंत्रण पाठवण्यात आलं होत. त्यापैकी देशातील निरनिराळ्या भागातील संतांचा समावेश आहे.


















