न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणार्या पवना धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, अद्यापही धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस आज (बुधवारी) दिवसभर कोसळत आहे. त्यामुळे पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे. धरण क्षेत्रात १०३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर पोहोचला आहे. आजपर्यंत ६३३ मिली मीटर पाऊस पडल्याचे पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी यांनी सांगितले.


















