- शहरवासीयांचे आ. लांडगे यांच्या भूमिकेवर लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. ऑगस्ट. २०२०) :- अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आनंदोत्सव साजरा करीत पिंपरी- चिंचवड शहरामध्ये एक लाख लाडू वाटप करण्याच्या उपक्रमाचे आयोजन भोसरी विधानसभेचे भाजपाचे हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांनी केले होते. मात्र लाडू वाटपास मज्जाव करणारी नोटीस पोलिसांनी बजावली आहे. त्यामुळे एक लाख लाडू वाटपाचा कार्यक्रम होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा अयोध्येत आज होत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलीस प्रशासनाने काल रात्री महाराष्ट्रातील भाजपच्या आमदारांमध्ये पहिली नोटीस भोसरीचे आमदार आणि पिंपरी- चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना बजावण्यात आली आहे. पोलिसांच्या नोटीसीमुळे आमदार महेशदादा काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


















