न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. ऑगस्ट. २०२०) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (बुधवारी) अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरु आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी श्रीराम जन्मभूमी भूमीपूजननिमित्त सांगवी येथील श्रीराम मंदिरात श्रीरामची आरती केली.
यावेळी महापौर उषा ढोरे, नगरसेवक हर्षल ढोरे, जोशी काका, शिवभक्त उमेश पवार, भाजप युवा मोर्चा प्रदेश सदस्य जवाहर ढोरे, पंढरीनाथ ढोरे, रवी पुजारी, अक्षय ढोरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी नागरिकांनी आनंद व्यक्त केला.


















