- मृतांच्या आकड्यातही मोठी वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी (दि. ०५ ऑगस्ट) रोजी ७९५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील १५ आणि हद्दीबाहेरील ०१ अशा १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात पुनावळे (पुरुष ६८ वर्षे), दापोडी (स्त्री ६० वर्षे), भोसरी (पुरुष ७५ वर्षे, स्त्री ४५ वर्षे), कासारवाडी (पुरुष ६३ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ९८ वर्षे, पुरुष ७७ वर्षे, पुरुष ५० वर्षे, पुरुष ४५ वर्षे), मोशी (स्त्री ५३ वर्षे), सांगवी (पुरुष ५३ वर्षे), निगडी (पुरुष ५७ वर्षे), पिंपरी (पुरुष ६० वर्षे), आकुर्डी (स्त्री ६३ वर्षे), किवळे (पुरुष ७२ वर्षे), चाकण (पुरुष ५० वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २५१०६ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ३९७० रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ४२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १७४०७ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.