न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२०) :- चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या विरोधात आज गुरुवारी (दि. ६) रोजी रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन सुरु केले आहे. भर पावसात हे आंदोलन सुरु आहे.
प्रशासनाकडून रुग्णसेविका, रुग्णसेवकावर प्रचंड अन्याय होत आहे. कोविड रुग्णालयात सहा तासच ड्युटी करण्याचा निर्णय आहे. पण, आम्हाला सात-सात, १२ तास ड्युटी करावी लागत आहे. यामुळे ताण येत आहे. राजीनामा दिला तरी चालेल असे सांगतात. स्टाफ, बाऊंसरच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय इतरही मागण्या ता कर्मचाऱ्यांच्या आहेत. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहचले आहे.