न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२०) महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) विळखा दिवसागणिक आता घट्ट होत चालला आहे. याच दरम्यान, रस्त्यावर गस्त घालणारे पोलीस आपले कर्तव्य ठामपणे बजावताना दिसून येत आहेत. परंतु गेल्या २४ तासात महाराष्ट्रातील आणखी १३७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील एकूण १०१६३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १८६५ अॅक्टिव रुग्ण असून एकूण मृतांचा आकडा १०९ वर पोहचल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.