- सामाजिक कार्यकर्ते नितीन कोकणे यांनी सुचविलेल्या कामांना प्राधिकरणाचा होकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२०) पिंपरी चिंचवड शहरातील जगताप डेअरी चौकातील प्राधिकरणाचा पुल मृत्यूचा सापळा ठरू पाहत आहे. वाहतुकीसाठी बनवण्यात आलेल्या या पुलावर अपघातांची मालिका सुरू आहे. मध्यरात्रीच्या सुमास मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते नितीन कोकणे यांच्या मागणीची दखल घेत, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पुलाची पाहणी केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन कोकणे, प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी प्रभाकर वसईकर यांच्यासोबत डेप्युटी इंजिनियर वसंत नाईक, इंजिनीयर श्रीकांत सवणे, डेप्युटी इंजिनियर संजय काशीद, कन्सल्टंट एम. जी. कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली.
या पूलावर वाहन चालविण्याची कमाल वेगमर्यादा ४० कि.मी. यादरम्यान आहे. मात्र, यापेक्षा अधिक ८० च्या स्पीडने वाहन चालकांकडून वाहने चालवली जात आहेत, असा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला.
सामाजिक कार्यकर्ते नितीन कोकणे यांनी पुलावरील रस्ता निसरडा झालेला आहे. तो जर व्यवस्थित केला तर अपघातांना आळा बसू शकतो. त्यासाठी प्रशासनाने रस्त्याच्या डागडुजीसह या ठिकाणी साईट ब्लींकर, रिप्लेक्टर व रबलरची आवश्यकता वाटल्यास तेही लावण्याचे नियोजन करावे, अशी मागणी केली. त्यावर वसईकर यांनी याबाबत लवकरच कार्यवाही सुरु करू, असे आश्वासन दिले.