न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२०) :- निगडी येथील पिंपरी चिंचवड शासकीय औद्योगिक संस्थेची (आयटीआय) यंदाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया एक ऑगस्टपासून सुरु झाली आहे. विविध व्यवसाय प्रक्षिशण अभ्यासक्रमामध्ये मुलींसाठी १२५ पेक्षा जास्त जागा राखीव आहेत.
या वर्षी मशिनिष्ट, टर्नर , मशिनिष्ट-ग्रायडंर, फिटर, इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन सिविल, ड्राफ्ट्समन मेकॅनिक , शिटमेंटल वर्कर, ऑपरेटर अँडव्हान्स मशिन टुल्स हे दोन वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम, तर वेल्डर (GMAW & GTAW ), कारपेंटर , प्लम्बर, फूड अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग व फॉन्ड्रीमन हे एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. १४ ऑगस्ट ही प्रवेश घेण्याची अंतिम मुदत आहे. ऑनलाईन प्रवेश आणि अभ्यासक्रमाच्या माहितीसाठी admission.dvet.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डी. एस.जगताप यांनी केले आहे.
प्रवेशप्रक्रियेसाठी ओव्हाळ मँडम (7972709910), भुमकर सर (9850276373), पाटील सर (9881981899), खोमणे सर (9890907648), जंगम सर (9834304972), शिंगणात मँडम (9850557061) आणि गुरव (7798106759) यांच्या संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य जगताप यांनी केले आहे.














