न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी (दि. ०६ ऑगस्ट) रोजी १०१२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील २१ आणि हद्दीबाहेरील ०३ अशा २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात विकासनगर, किवळेतील ७७ वर्षीय पुरुष, पिंपरीतील ६३, ४६ व ५२ वर्षीय तीन पुरुष, चिंचवड येथील ६२ व ६५ वर्षीय महिला, ६४, ३६ वर्षाचा युवक, भोसरीतील ८६ वर्षीय वृद्ध, कासारवाडीतील ७० वर्षीय पुरुष, थेरगावातील ६५ वर्षीय महिला, ४९ वर्षीय पुरुष, मोशीतील ६० वर्षीय महिला, ७४ वर्षीय पुरुष, काळेवाडीतील ६४ वर्षीय महिला, दापोडीतील ७० वर्षीय महिला, निगडीतील ७० वर्षीय पुरुष, दिघीतील ७० वर्षीय महिला, नेहरुनगर येथील ७५ वर्षीय पुरुष, रुपीनगर येथील ४५ वर्षीय पुरुष, च-होलीतील ५९ वर्षीय पुरुष आणि नारायणगाव येथील ८५ वर्षीय पुरुष, शिरुर मधील ३६ वर्षाचा युवक, येरवड्यातील ७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २६११८ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ४१७५ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ४४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १७६७३ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.














