न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश केला आहे, नियमात बदल केला जाणार नाही. पण, एखाद्या आस्थपनेत जास्त रुग्ण सापडले. तर ती बंद करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
२२ मे पूर्वी शहरात २६५ रुग्ण होते. त्यामुळे राज्य सरकारने २२ मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळले होते. जुन, जुलै महिन्यात रूग्णाची संख्या वाढत आहे. ऑगस्टच्या पहिल्या दिवसापासून दिवसाला एक हजारहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. रुग्णसंख्या २५ हजार ४९५ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहराचा समावेश राज्य सरकारने रेडझोनमध्ये केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पिंपरी – चिंचवड शहराच्या दौ-यावर असताना त्यांनी आयुक्तांना शासन निर्णयाची माहिती दिली. त्यामुळे शहर आता पुन्हा रेडझोन असणार आहेत.














