न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट. २०२०) :- काम सांगितल्याच्या रागातून कंपनीतील एका कामगाराने दुस-याला ब्रासच्या जॉबने मारहाण करून जखमी केले. ही घटना ९ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता मावेन टूल्स अँड अॅक्नॉलॉजिस या कंपनीत घडली.
पंकज मधुकर आग्रे (वय ३३, रा. च-होली खुर्द, ता. खेड) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश बाबुराव साने (वय ३५, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.