न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षक साईनाथ लाखे (वय ५७) यांचे आज (बुधवारी) पहाटे कोरोनामुळे निधन झाले आहे.
त्यांना वायसीएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण, पुन्हा त्रास होऊ लागल्याने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. वायसीएममधील चाणक्य विभागात कार्यालयीन अधिक्षक म्हणून ते सेवा बजावत होते.














