न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची दहावी बैठक आज गुरुवार, दिनांक १३/०८/२०२० रोजी दुपारी १२.०० वाजता पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे कार्यालय, ऑटोक्ल्स्टर, चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेली होती.
बैठकीस मा.अध्यक्ष, पीसीएससीएल श्री. नितीन करीर (IAS), मा. संचालक श्रीमती ममता बत्रा, मा.संचालक तथा विभागीय आयुक्त, पुणे श्री.सौरभ राव, मा.संचालक, पीसीएससीएल तथा पोलीस आयुक्त, पिंपरी यांचे प्रतिनीधी हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीस उपस्थित होते. तसेच मा.महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तथा संचालक, पीसीएससीएल उषा ऊर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते तथा संचालक, पीसीएससीएल श्री.नामदेव ढाके, मा.स्थायी समिती अध्यक्ष तथा संचालक, पीसीएससीएल श्री.संतोष (आण्णा) लोंढे, विरोधी पक्षनेते तथा संचालक, पीसीएससीएल श्री. नाना उर्फ विठ्ठल काटे, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल तथा संचालक, पीसीएससीएल श्री.राजेंद्र जगतापव , मा.आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी/संचालक, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. श्री.श्रावण हर्डीकर हे उपस्थित होते. या व्यतिरिक्त मुख्य वित्तीय अधिकारी श्री. जितेंद्र कोळंबे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निळकंठ पोमण व श्री.राजन पाटील, जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रक्चर श्री. अशोक भालकर सभेस उपस्थित होते.
सभेमध्ये दि. ३०/१२/२०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या नवव्या बैठकीचा सभावृत्तांत कायम करण्यात आला. माजी मा.स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांचे जागी सध्याचे स्थायी समिती अध्यक्ष संतोष (आण्णा) लोंढे यांची निवड करण्यात आली. माजी मा. सभागृह नेते एकनाथ पवार यांचे जागी सभागृह नेते नामदेव ढाके यांची निवड करण्यात आली. मा.माजी विभागीय आयुक्त, पुणे डॉ.दिपक म्हैसेकर यांचे जागी सध्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची निवड करण्यात आली. मा. पोलीस आयुक्त श्री.के पद्मनाभन यांचे जागी सध्याचे मा.पोलीस आयुक्त (IPS) श्री.संदीप बिष्णोई यांची नियुक्ती करणेत आली. माजी व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल श्रीमती नयना गुंडे यांचे जागी नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री.राजेंद्र जगताप यांची नियुक्ती करण्यात आली.
अर्थिक वर्ष २०१९-२० च्या सुधारित अंदाजपत्रकाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच अर्थसंकल्पात नवीन लेखाशीर्षाची निर्मिती व अर्थसंकल्पाच्या विनीयोगास मान्यत देणेत आली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबतचे अधिकार प्रदान करणेबाबत चर्चा होऊन त्यास मान्यता देणेत आली.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.अंतर्गत पिंपळे गुरव येथील रस्ते, लिनियल गार्डन विस्तार, प्राथमिक आरोग्य केंद्राची सुधारणा करणे, म्युनिसिपल ई क्लासरुम प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणेकामी पी.एम.यु.मार्फत अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे, Auditorium &Broadcasting (सभागृह व प्रसारण) विकासाच्या अहवालास मान्यता देणे, School Health Monitoring – Detailed System Designअहवालास मान्यता देणे, Public Toilet Master Planतसेच PPP तत्त्वावर सदर प्रकल्पाची अंमलबजावणी करणे इत्यादी विषयांवर चर्चा होऊन सदर विषय मान्य करणेत आले. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. करता तयार करण्यात आलेल्या SPV Business Plan बाबत चर्चा करण्यात येऊन पुढील सभेत आढावा घेऊन अंतिम आराखडा सादर करणेबाबत सूचना करण्यात आल्या.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या पॅन सिटी प्रकल्पांतर्गत व्हेरिएबल मेसेज साइनबोर्ड, सिटी मोबाईल ऍप, स्मार्ट कियॉस्क व वाय-फाय सारख्या डिजीटल सेवा मोफत देणेकामी मोनेटायझिंग एजन्सी म्हणून मे.Lemma Technogies यांची नियुक्ती करणे, सर्व आय. टी. पायाभूत सुविधांची तपासणी करण्यासाठी त्रयस्थ तपासणी एजन्सी म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांची नियुक्ती करणे, मे.E&Y या प्रकल्प सल्लागार कंपनीस तांत्रिक सल्लागारपदी मुदतवाढ देणे इत्यादी विषयांवर चर्चा होऊन मान्यता देणेत आली.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.अंतर्गत पिंपळे गुरव येथील रस्ते, लिनियल गार्डन विस्तार, प्राथमिक आरोग्य केंद्राची सुधारणा करणे, School Health Monitoring – Detailed System Designअहवालास मान्यता देणे, Public Toilet Master Planतसेच PPP तत्त्वावर सदर प्रकल्पाची अंमलबजावणी करणे इत्यादी विषयांवर चर्चा होऊन सदर विषय मान्य करणेत आले. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. करता तयार करण्यात आलेल्या SPV Business Plan बाबत चर्चा करण्यात येऊन त्यास मान्यता देणेत आली.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या पॅन सिटी प्रकल्पांतर्गत व्हेरिएबल मेसेज साइनबोर्ड, सिटी मोबाईल ऍप, स्मार्ट कियॉस्क व वाय-फाय सारख्या डिजीटल सेवा मोफत देणेकामी मोनेटायझिंग एजन्सी म्हणून मे.Lemma Technogies यांची नियुक्ती करणे, सर्व आय. टी. पायाभूत सुविधांची तपासणी करण्यासाठी त्रयस्थ तपासणी एजन्सी म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांची नियुक्ती करणे, मे.E&Y या प्रकल्प सल्लागार कंपनीस तांत्रिक सल्लागारपदी मुदतवाढ देणे इत्यादी विषयांवर चर्चा होऊन मान्यता देणेत आली.
महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचे आरोग्य निरोगी रहाण्यासाठी School Health Monitoring या प्रकल्पाच्या Detailed System Design अहवालास व सदर प्रकल्पाच्या निविदा काढण्यास मान्यता देण्यात आली. स्टार्टअप्स आणि इलेक्ट्रीक सायकली/स्कुटर शेअरिंग प्रकल्पासाठी र.रु.५ कोटीची तरतूद करणे तसेच पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरसाठी र.रु.५० लाख देणेस चर्चा होऊन मान्यता देणेत आली. याचबरोबर कंपनी सेक्रेटरी, लेखापाल तसेच कन्सल्टंट चार्टर्ड अकाऊंट यांची सन २०२०-२१ या अर्थिक वर्षासाठी नेमणूकीबाबत चर्चा होऊन त्यास मान्यता देणेत आली.
अर्थिक वर्ष २०१९-२० च्या सुधारित अंदाजपत्रकाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच अर्थसंकल्पात नवीन लेखाशीर्षाची निर्मिती व अर्थसंकल्पाच्या विनीयोगास मान्यत देणेत आली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वित्तीय अधिकार प्रदान करणेबाबत चर्चा होऊन त्यास मान्यता देणेत आली.याचबरोबर पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.चे अर्थिक वर्ष२०२०-२१ चे र.रु.७८८.५३ कोटीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.














