न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ६८ मिलिमीटर पाऊस कोसळला असून धरण ५६. १९ टक्के भरले आहे.
१ जून २०२० पासून आजच्या तारखेपर्यंत ९१२ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत एकूण ३ हजार ९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर पवना धरण हे शंभर टक्के भरले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस खूपच कमी आहे. दरम्यान, १ जूनपासून पवना धरणाच्या पाणी साठ्यात २०.९ टक्के वाढ झाली आहे.














