न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) रोजी ९४६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात काळभोरनगर (पुरुष ७६ वर्षे), नेहरुनगर (स्त्री ७० वर्षे), रहाटणी (स्त्री ५३ वर्षे, स्त्री ७५ वर्षे), खराळवाडी (पुरुष ४८ वर्षे), निगडी (पुरुष ७२ वर्षे), चिखली (पुरुष ७० वर्षे), भोसरी (स्त्री ६० वर्षे, पुरुष ६० वर्षे), काळेवाडी (स्त्री ८५ वर्षे), चिंचवड (पुरुष ५३ वर्षे), वाल्हेकरवाडी (पुरुष ८० वर्षे), यमुनानगर (स्त्री ६९ वर्षे), लोणावळा (पुरुष ६५ वर्षे), धायरी (पुरुष ७३ वर्षे), आळंदी (पुरुष ६५ वर्षे), मुळशी (पुरुष ५० वर्षे), देहुरोड (स्त्री ६८ वर्षे), मरकळगाव (पुरुष ३६ वर्षे), जुन्नर (पुरुष ६४ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३२५६५ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ५८५३ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ५३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २२४५३ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.