न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. ऑगस्ट. २०२०) :- राष्ट्रवादीचे गटनेते नाना काटे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा पक्षाचा निर्णय आहे.
राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, विधी समितीचे माजी सभापती संतोष कोकणे इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत.
दरम्यान अजित पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावेळी आले असता इच्छुकांची पत्रे मला मिळाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक घ्यावी. इच्छुकांची नावे मला पाठवावीत, असा आदेश शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना दिला होता. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे इच्छुकांची नावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविणार आहेत. त्यामुळे या पाचपैकी कोणाच्या गळ्यात विरोधी पक्षनेत्याची माळ पडते, हे लवकरच कळेल.














