न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. ऑगस्ट. २०२०) :- गणपती व देवीच्या मूर्ती विक्रीकरीता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जागा भुईभाडे पद्धतीने देणेबाबत पालिकेच्या भूमी जिंदगी विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना कळविले आहे.
गणेश उत्सव व नवरात्र उत्सव कालवधीत गणपती व देवीच्या मूर्ती विक्रीकरिता हंगामी पद्धतीने जागा भुई भाडेने देणेबाबत अ, ब, क, ड, इ, फ, ग व ह क्षेत्रिय कार्यालयांना कळविण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती व देवीच्या मूर्ती विक्री स्टॉलला परवानगी देताना सामाजिक अंतर राखले जाईल याची खबरदारी घ्यावी, प्रत्येक स्टॉलमध्ये सॅनीटायझर उपलब्ध ठेवणे, मास्कचा वापर करणे, ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राखणे आदी अटींसह स्टॉलधारकांना परवानगी देण्यात यावी, असे भूमी व जिंदगी विभागाने क्षेत्रिय कार्यालयांना कळविले आहे.














