न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी पीएमपीएलचे सह व्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली आहे. शहरात करोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ही नियुक्ती केली असल्याचे आदेशात म्हटले आहे.
महापालिकेच्या नवनियुक्त तर प्रशासन अधिकारी चेतना केरूरे यांची पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत उपायुक्त म्हणून ७ पदांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी केवळ सुभाष इंगळे हे एकमेव अधिकारी उपायुक्त म्हणून सध्या काम पाहत आहेत. चारठणकर हे दुसरे उपायुक्त ठरणार आहेत.














