न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. ऑगस्ट. २०२०) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यांत लॅाकडाउन लागू करण्यात आलं. तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रातील जिम व्यवसाय बंद आहे. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या लोकांवरही उपासमारीची वेळ आली आहे.
केंद्र सरकारने लॉकडाउनचे निर्बंध शिथील करताना जिम सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र राज्य सरकारने त्यासाठी नकार दिला. यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोल सुरु असून जिम सुरु कऱण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी होत होती.
त्यामुळे ठाकरे सरकारने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून दोन दिवसात अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सर्व अटी-शर्थींचं पालन करुन राज्यभरात जिम सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याचं जय वडेट्टीवार यांनी टीव्ही ९ शी बोलताना सांगितलं. “परवा माझ्याकडे प्रस्ताव आला असता सही करुन फाईल पुढे पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांची दोन दिवसांत स्वाक्षरी झाली की राज्यात जिम सुरु करण्याची परवानगी दिली जाईल” , असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.


















