न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. ऑगस्ट. २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी आपण प्रत्येक उत्सव साधेपणाने साजरा करत प्रशासनाला सहकार्य करत आहोत. गणेशोत्सवदेखील साधेपणाने साजरा करा. तसेच गणेश विसर्जनाला परवानगी दिल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमीत कमी लाख लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही, असे स्पष्ट मत राज्याचे मुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
पुणे व पिंपरी – चिंचवड मधील कोरोना बाधितब रुग्ण कमी होण्याचे प्रमाण वाढते आहे ही खूप सकारात्मक आणि समाधानकारक बाब आहे. परंतु, या संकटाचा धोका अजून संपलेला नसून सर्वतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे.
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना निर्मूलन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पुणे शहरासह जिल्हयातील अनेक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.











