न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. ऑगस्ट. २०२०):- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १४ ऑगस्ट) रोजी ९१९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात भोसरी (स्त्री ४७ वर्षे), निगडी (स्त्री ८४ वर्षे, पुरुष ६७ वर्षे), मोशी (पुरुष ४८ वर्षे), तळवडे (स्त्री ५८ वर्षे, स्त्री ५८ वर्षे), रहाटणी (पुरुष ५१ वर्षे), चिंचवड (पुरुष ७९ वर्षे, पुरुष ६७ वर्षे), थेरगाव (स्त्री ७१ वर्षे), दापोडी (पुरुष ७८ वर्षे), देहुरोड (पुरुष ६८ वर्षे), जुन्नर (स्त्री ६३ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३३४८४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ५४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २३६७२ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.