न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाने निर्गमित केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांचा अवलंब करुन ठिकठिकाणी आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना राबविणेत येत आहे. या योजनेसाठीच्या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रणालीचे अनावरण महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नगरगोजे, नगरसदस्य राजू मिसाळ, कुंदन गायकवाड, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, उपायुक्त सुभाष इंगळे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, मनोज लोणकर, स्मिता झगडे, सुनिल आलमेलकर, बाळासाहेब खांडेकर, संदीप खोत, सह शहर अभियंता अशोक भालकर, मकरंद निकम, कार्यकरी अभियंता प्रदीप पुजारी, उपअभियंता शेखर गुरव, अनघा पाठक आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेकरिता मा.महापालिका सभा ठराव क्र.३९, दि.२०/०६/२०१७ मंजूर आहे. सदर ठरावानुसार सद्यस्थितीत चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीघरे बांधणे प्रकल्प चालू
आहेत.