न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) रोजी ९६३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात स्पाईन रोड मोशी (पुरुष ६६ वर्षे), रामनगर आकुर्डी (स्त्री ५५ वर्षे), रुपीनगर (पुरुष ५५ वर्षे), थेरगाव (स्त्री ६२ वर्षे, पुरुष ६० वर्षे), निगडी (पुरुष ७१ वर्षे), संभाजीनगर (स्त्री ४४ वर्षे), काळेवाडी (पुरुष ७३ वर्षे, पुरुष ७१ वर्षे), किवळे (स्त्री ६५ वर्षे), निगडी प्राधिकरण (पुरुष ७३ वर्षे), मोरवाडी (पुरुष ७० वर्षे), मिलिंदनगर (पुरुष ६० वर्षे), वाकड (पुरुष ६० वर्षे), नेहरुनगर (पुरुष ५० वर्षे), भोसरी (पुरुष ६८ वर्षे), नवी सांगवी (स्त्री ५७ वर्षे), पिंपरी (स्त्री ७० वर्षे), चिखली (पुरुष ७० वर्षे), खेड (पुरुष ६९ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३४४४७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ५९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. राज्य शासनाचे कोव्हीड १९ पोर्टलनुसार ३१ पिं. चिं. मनपा रहिवाश्यांचे पूर्वी झालेले मृत्यू हे पिं.चिं. मनपा हद्दीबाहेरील रुग्णालयात झाल्याची नोंद घेतल्याने प्रगतीपर अहवाल ५९९ आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २४३७७ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.