न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी रात्री त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एम्स रुग्णालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु नुकतीच उपचारानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.














