- वाकड परिसरात ठीक-ठिकाणी गणेश विसर्जन हौदाची सोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेता व गणेश विसर्जन घाटावरील धोका ओळखुन माजी नगरसेवक विनायक गायकवाड व माजी स्थायी समिती सभापती, विद्यमान नगरसेविका सौ. ममताताई विनायक गायकवाड यांच्या माध्यमातून विनायक गायकवाड युथ फाऊंडेशनतर्फे वाकड परिसरात गणेश विसर्जन हौद तयार केले आहेत.
यात युरो स्कुल शेजारी, पिंक सिटी रोड/ग्लोबल पंजाब हॉटेल शेजारी, पिंक सिटी रोड / पिझ्झा हट शेजारी, उत्कर्ष चौक / छत्रपती चौक कस्पटेवस्ती या ठिकाणांचा समावेश आहे.
“नागरिकांनी गणेश विसर्जनाकरिता घाटावर गर्दी न करता ठिकठिकाणी गणेश विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे. याठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग चे पालन करून नागरिक व सोसायटीधारकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन करावे, ” असे आवाहन माजी नगरसेवक विनायक गायकवाड व माजी स्थायी समिती सभापती, विद्यमान नगरसेविका सौ. ममताताई विनायक गायकवाड यांनी वाकड परिसरातील नागरिकांना केले आहे.














