न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- फिर्यादी गोविंद त्यांच्या मित्राच्या कुटुंबासोबत तनिष ऑर्चिड सोसायटी येथे राहतो. रविवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास तो घरी मोबाइलवर चित्रपट पाहत बसला होता.
त्यावेळी अल्पवयीन मुलगा तिथे आला. त्याने गोविंदला किती वाजलेत असे विचारले आणि भाजी कापण्याच्या सुरीने गोविंदवर वार केला. यामध्ये गोविंदच्या हातावर, पाठीवर, पायावर आणि पोटावर गंभीर दुखापत झाली.
ही घटना रविवारी (दि. १६) रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास तनिष चऱ्होली येथील ऑर्चिड सोसायटीत घडली. गोविंद प्रकाश कुटे (वय २५, रा. तनिष ऑर्चिड सोसायटी, च-होली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी १७ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.














