न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवडच्या वतीने देण्यात आलेल्या ३१ मार्च २०२० ते १२ जून २०२० या कालावधीतील संपूर्ण टाळेबंदी लागू झाल्याने ऑनलाईन अपॉंइटमेंट असणा-या अर्जदारांच्या चाचण्या झालेल्या नाहीत.
तथापि ३१ मार्च २०२० ते १२ जून २०२० या कालावधीमधील दिनांक ३१ मार्च व १ एप्रिल २०२० करीता अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता दिनांक २३ ऑगस्ट २०२० रोजी तर २ व ४ एप्रिल २०२० रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी २९ ऑगस्ट २०२०, ७ व ८ एप्रिल २०२० रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता ३० ऑगस्ट २०२०, ९ व १३ एप्रिल २०२० रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता ५ सप्टेंबर २०२०, १५ व १६ एप्रिल २०२० रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता ६ सप्टेंबर २०२०, १७, १८ व २० एप्रिल २०२० रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता १२ सप्टेंबर २०२०, २१,२२ व २३ एप्रिल २०२० रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता १३ सप्टेंबर २०२०, २४,२७ व २८ एप्रिल २०२० रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता १९ सप्टेंबर, २९ व ३० एप्रिल रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता २० सप्टेंबर, ४, ५, ६, ८, ११ व १२ मे रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता २९ सप्टेंबर तर १३ मे ते १२ जून रोजी अपॉईंटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता २७ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये उपस्थित रहावे.
या चाचणीकरीता येताना सर्व उमेदवारांनी चेह-यावर मास्क व हँड ग्लोव्हज घालणे बंधनकारक असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड, यांनी कळविले आहे.











