न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. १८ ऑगस्ट) रोजी ७८५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात मोरवाडी (पुरुष ६७ वर्षे), संत तुकारामनगर पिंपरी (पुरुष ७५ वर्षे), आकुर्डी (स्त्री ७० वर्षे, स्त्री ७८ वर्षे), चिंचवड (पुरुष ८१ वर्षे), अजमेरा कॉलनी (पुरुष ६३ वर्षे), चिखली ( ७०, ६२, ६०, ३५ वर्ष पुरुष), तळवडे (पुरुष ३५ वर्षे) भोसरी (स्त्री ५९ वर्षे, पुरुष ४६ वर्षे, पुरुष ३१ वर्षे), दिघी (पुरुष ७३ वर्षे), बोपखेल (पुरुष ४२ वर्षे), खराळवाडी (पुरुष ५२ वर्षे), थेरगांव (पुरुष ६८ वर्षे), निगडी (पुरुष ८४ वर्षे), वाकड (पुरुष ७१ वर्षे), अंजठानगर (स्त्री ६० वर्षे), वल्लभनगर (पुरुष ६५ वर्षे), वाल्हेकरवाडी (पुरुष ३५ वर्षे), हिंजवडी (पुरुष ४९ वर्षे), देहूरोड (स्त्री ६६ वर्षे), कामशेत (पुरुष ६३ वर्षे) निघोजे -खेड (पुरुष ५६ वर्षे), जुन्नर (पुरुष ६७ वर्षे), मावळ (पुरुष ४७ वर्षे), तळेगांव दाभाडे (पुरुष ६६ वर्षे) या रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३६८६३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ६८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २५२५८ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.











