- चोराचा मृत्यू मारहाणीने नव्हे तर, हृदय विकाराच्या झटक्याने…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. ऑगस्ट २०२०) :- भोसरी गावठाण येथील एका घरात शिरून चोरटा चोरीसाठी गेला होता. हा प्रकार तिथल्या रहिवाशांच्या लक्षात आला. नागरिकांनी त्याला बांधून ठेवले आणि मारहाण केली. यामध्ये त्या चोरट्याचा मृत्यू झाला. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान भोसरी परिसरात झालेल्या चोराचा मृत्यू हा नागरिकांच्या मारहाणीत झाला नसून हृदय विकाराच्या झटक्याने झाला असल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे. संतोष महादू हौसे वय- ३८ असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.