न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. ऑगस्ट २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. १९ ऑगस्ट) रोजी ८५३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात भोसरी (पुरुष ९१ वर्षे, पुरुष ५१ वर्षे), चिखली (पुरुष ५४ वर्षे, पुरुष ५९ वर्षे, स्त्री ६७ वर्षे, पुरुष ४५ वर्षे), रावेत (स्त्री ८६ वर्षे, पुरुष ३२ वर्षे), कृष्णानगर (पुरुष ५५ वर्षे), थेरगांव( स्री ६६ वर्षे), गांधीनगर स्त्री ५८ वर्षे), पिंपरी (स्त्री ३१ वर्षे, पुरुष ५७ वर्षे,स्त्री ६४ वर्षे), चिंचवड (स्त्री ४९ वर्षे, पुरुष ७४ वर्षे), तळवडे (पुरुष ७५ वर्षे), बिजलीनगर (पुरुष ६८ वर्षे), काळेवाडी (पुरुष ८२ वर्षे पुरुष, ४५ वर्षे स्त्री ३० वर्षे), निगडी (स्त्री ४० वर्षे पुरुष, ५९ वर्षे) भोसरी (स्त्री ७० वर्षे), रुपीनगर ( पुरुष ६५ वर्षे, पुरुष ४५ वर्षे), सांगवी (पुरुष ६६ वर्षे), दिघी (पुरुष ७७ वर्ष), पिंपळे गुरव (स्त्री ४९ वर्षे), कासारवाडी (स्त्री ५७ वर्षे), चिखली (पुरुष ६० वर्षे), रहाटणी (पुरुष ८० वर्षे, पुरुष ६५ वर्षे), फुगेवाडी (पुरुष ८० वर्षे), चाकण (पुरुष ६६ वर्षे, स्त्री ५६ वर्षे, पुरुष ७० वर्षे), आंबेठाण (स्त्री ५४ वर्षे), शिरुर (पुरुष ७२ वर्ष), खेड (पुरुष ८८ वर्षे), हिंजवडी (पुरुष ३७ वर्षे) या रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३७७१६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ७१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २५३९९ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.














