- प्रवाशांचे साहित्य, बॅगा आदींचे निर्जंतुकीकरण करता येणार….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. ऑगस्ट. २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझेशन मशीन बसवण्यात आली आहे. मंगळवारी याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. स्थानकात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना स्वेच्छेने त्यांचे साहित्य, बॅगा आदींचे निर्जंतुकीकरण करता यावे, यासाठी स्थानकात ‘ बॅग सॅनिटायझेशन मशीन ‘ बसवण्यात आले आहे.
आरक्षण कार्यालयाजवळ असणाऱ्या या यंत्रातील ‘ अल्ट्रावायोलेट ‘ किरणांद्वारे एक बॅग साधारण १५ ते २० सेकंदांत निर्जंतुक होणार आहे. खासगी कंपनी आणि रेल्वेने एकत्रितरित्या हे मशीन बसविले असून, यासाठी प्रवाशांना एका बॅगच्या निर्जतुकीसाठी १० रुपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय या ठिकाणी बॅग रॅपिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी प्रति बॅग ३० रुपये दर आकारण्यात येणार आहे.















