न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. ऑगस्ट २०२०) :- भारत सरकारच्या MSME सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय यांच्या अंतर्गत येणाऱ्या समितीमध्ये स्टॅंडिंग कमिटी अर्थात स्थायी समिती सदस्यपदी युवा उद्योजक सागर सुनील जाधव यांची नियुक्ती केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील चऱ्होली फाटा येथील सागर जाधव हे रहिवाशी आहेत. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या वडिलांच्या पारंपरिक उद्योगांमध्ये मदत केली. त्याच वेळी समाजातील नव उद्योजकांसाठी मार्गदर्शक व मदतनीसाची भूमिका पार पाडली. त्यांनी वेळोवेळी नव उद्योजकांसाठी शासन दरबारी त्यांच्या मागण्यांची व कामांची वाचा फोडून ती कामे मार्गी लावली. आहेत.
त्यांच्या निवडीसाठी भारत सरकारच्या युवा क्रीडा समितीचे सदस्य तसेच महाराष्ट्र यूथ ब्रँड अँबेसिडर विकास सोनवणे यांनी शिफारस करून पुढील कामाचा पाठपुरवठा केला. तसेच या खात्याचे जॉईंट सेक्रेटरी सुधीर गर्ग यांच्या मान्यतेने व त्यांच्या सहीनिशी नियुक्ती पत्र सागर जाधव यांना प्राप्त झाले. सागर जाधवांच्या या नियुक्तीसाठी केंद्रीय खाजगी सचिव विनोद शर्मा तसेच वरिष्ठ अधिकारी रंगनाथ मिश्रा यांनी वेळोवेळी पाठपुरवठा केला. त्यांच्या या निवडीबद्दल MSME मंत्रालयातील अधिकारी वर्गाने अभिनंदन व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. लाला अर्बन बँकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब लोणारी यांनीदेखील त्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.















