- गणेशोत्सवानिमित्त ”ऑनलाईन घरगुती गौरी, गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. ऑगस्ट २०२०) :- काय मग? घरात गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर आता लगबग वाढली असेल ना? कुणाचा दीड दिवस, कुणाचे गौरी गणपती तर कुणाचे बाप्पा अनंत चतुर्दशीपर्यंत मुक्काम करणार असतील. आता साक्षात बाप्पांचं घरी आगमन होणार म्हटल्यावर सजावट देखणी आणि लाखात एक झालीच पाहिजे, नाही का? त्यात गौराई घरी येणार असतील तर त्याचं कौड-कौतुक जरा जास्तच करणार ना आपण? अहो, मग इतक्या प्रेमानं, कष्टानं घडवलेल्या सजावटीचं पाहुण्यांकडून फक्त कौतुकच का? त्यासोबत एखादं बक्षीस मिळाल तर, ते कोणाला नकोय? चला तर मग, आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे खंदे समर्थक तसेच पांडाभाऊ साने युवा मंचचे अध्यक्ष पांडाभाऊ साने यांच्या वतीने ऑनलाईन आयोजित घरगुती गौरी, गणपती सजावट स्पर्धेत भाग घेऊ, अनं कोरोनापासून जरा उसंत घेऊ आणि बक्षीसही मिळवू.
उपक्रमाची माहिती देताना युवा नेते पांडाभाऊ साने म्हणाले की, यंदा कोरोनामुळे शहरात गणेशउत्सव साधेपणाने साजरा होत आहे. कोरोनामुळे नागरिक भयग्रस्त आहेत. त्यांच्या मनातून भीती घालविण्यासाठी व त्यांना विरंगुळा मिळावा यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘घरगुती गौरी, गणपती सजावट स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. उत्सवादरम्यान घरोघरी गणेशाची सुंदर आरास केली जाते. छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिला जातो. या घरगुती देखाव्यांना प्रसिध्दी व बक्षीसही मिळावे, कौतुक व्हावे तसेच घरगुती गणेश सजावटीसाठीच्या कौशल्य, कला, गुणांना अधिकाधिक वाव मिळावा हा या मागचा खरा उद्देश आहे. यासाठी स्पर्धकांनी आपल्या घरच्या गौरी गणपती सजावटीचा फोटो पूर्ण पत्त्यासह खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायचा आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला एल.ई.डी टीव्ही मिळणार आहे. याशिवाय इतर स्पर्धकांना स्मार्ट फोन, वॉटर प्युरीफायर, गॅस शेगडी, होम थिएटर मिक्सर, कुकर, डिनरसेट, ज्यूसरसह आदी बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम व अटी :-
स्पर्धेत सहभागी होण्याची पध्दत एकदम सोपी आणि सोईस्कर आहे. १) स्पर्धकांनी आपल्या गौरी गणपतीच्या घरगुती सजावटीचा स्वतंत्र फोटो व गणपती सजावटीसोबत सेल्फी फोटो ९४०६९०९०९० या हॉटसअपवर पाठवावा. २) स्पर्धकांनी स्वत:चे पुर्ण नाव पत्ता (सोसयटीसह) संपर्क क्रमांक या ९४०६९०९०९० क्रमांकावर पाठवावा. ३) अंतिम निर्णय आयोजकांचा असेल. ४) स्पर्धेचा निकाल हा अनंत चतुर्थीच्या दिवशी जाहीर होईल. अधिक माहितीसाठी +९१ ९८५०५०७००३, +९१ ९८२३६०६०१८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. चिखली परिसरातील सर्व गणेशभक्तांनी या ऑनलाईन स्पर्धेत सहभागी होऊन भरघोस बक्षीसं जिंकण्याची सुर्वणसंधी साधावी, असे आवाहन युवा नेते पांडाभाऊ साने यांनी केले आहे.















