न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. ऑगस्ट. २०२०) :- ग्लोबल व्हीजन फाऊंडेशनच्या वतीने २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या नेत्रदान पंधरवड्यानिमित्ताने नेत्रदानाची शपथ घ्या आणि मोफत नेत्र तपासणी करून घ्या अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी महापौर माई ढोरे यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. हे शिबिर सांगवीच्या शितोळेनगर मधील नित्यसेवा आय हॉस्पिटल आणि पिंपळे सौदागर येथील ग्लोबल आय इंस्टीटयूट येथे होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. बबन डोळस यांनी दिली.
नेत्रतज्ञ डॉ. बबन डोळस यांच्या पुढाकाराने नुकतेच या फाऊंडेशनला राष्ट्रीय आरोग्य मानांकन संस्थेचे एनएबीएच गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. डॉ . डोळस यांनी २००८ साली सुरू केलेली नेत्रपेढी ही पिंपरी चिंचवड परिसरातील पहिलीच पेढी ठरली.















