न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने घाटावर तसेच हौदात गणेश विसर्जन करण्यास मनाई केली आहे. गणेशभक्तांची ही अडचण दूर करण्यासाठी नगरसेवक वसंत बोराटे यांच्याकडून मूर्तिदानासाठी खास रथाची सोय केली आहे.
वाहत्या पाण्यात तसेच हौदात विसर्जन करण्यास महापालिकेने मनाई केली आहे. यामुळे गणेश मूर्तीचे विसर्जन करायचे तरी कुठे ? तसेच दरवर्षी घाटांवर मूर्तीदान उपक्रम राबविला जातो. मात्र सध्या सर्वच घाट बंद आहे. त्यामुळे गणेशमूर्त्यांचे काय करायचे, असा प्रश्न गणेश भक्तांना पडला आहे.
यावर उपाय म्हणून नगरसेवक वसंत बोराटे यांनी एक रथ तयार केला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी हा रथ सोसायट्या तसेच विविध वस्त्यांमध्ये जाऊन गणेश मूर्त्या संकलित करणार आहे. जमा झालेल्या मूर्ती विधिवत विसर्जनासाठी महापालिका किंवा एखाद्या सामाजिक संस्थेस देणार असल्याने बोराटे यांनी सांगितले.















