न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने खरेदी केलेल्या १ लाख अँटीजेन रॅपिड टेस्ट किट संपत आल्या आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन आणखी १ लाख अँटीजेन किट खरेदी करणार आहे.
शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची चाचणीची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी पालिकेने १ लाख अँटीजेन किट थेट पद्धतीने खरेदी केले. हे किट पालिकेस जलैच्या पहिल्या आठवड्यात मिळाले. तपासणीसाठी एकूण ५ कोटीपेक्षा अधिक खर्च करण्यात आला. अँटीजेनच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यास १० जुलैला सुरुवात करण्यात आली.
त्या माध्यमातून आतापर्यंत मोठ्य प्रमाणात तपासणी करण्यात आली आहे. हे किट संपत आल्याचे वैद्यकीय विभागाने कळविले आहे. त्यामुळे पालिकेच्या भांडार विभागाकडू आणखी १ लाख अँटीजेन किट खरेद केले जात आहे. त्यासाठी निविदा प्रकिया राबविली आहे.















