न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. ऑगस्ट. २०२०) :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो कोविड सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन काल (बुधवार) सायंकाळी पार पडले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे सध्याची पावसाची परिस्थिती व वेधशाळेवर भाष्यं करताना म्हणाले की, पाऊस भरपूर पडणार म्हटलं की, ऊन पडणार… तर उद्या ऊन पडणार असं म्हणतात त्यावेळी छत्री घेऊन हमखास बाहेर पडायचे, असा आत्तापर्यंतचा वेधशाळेचा अंदाज होता. पण आता खूप सुधारणा झाली असून अंदाज बरोबर येत आहेत. मात्र पाऊसच हुलकावणी देत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी ऑनलाईन उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शहरातील कोविड सेंटर उभारत असताना पाऊस पडत होता. दरम्यानच्या काळात पाऊस तर आहेच, आपल्याकडे उद्या भरपूर पाऊस पडणार असे म्हणतात तेव्हा, धरून चालायचं की ऊन पडणार…आणि उद्या ऊन पडणार असे म्हणतात त्यावेळी छत्री घेऊन हमखास बाहेर पडायचं. असा आत्तापर्यंतचा वेधशाळेचा अंदाज होता. पण त्याच्यातही आपण खूप सुधारणा केली आहे. वेधशाळेचे अंदाज खूप बरोबर येत आहेत. मात्र, आता वेधशाळेच अंदाजबरोबर यायला लागल्यानंतर पाऊस हुलकावणी देऊ लागला आहे. असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो कोविड सेंटरची उभारणी करत असताना पाऊस पडत होता. तसेच मुंबईमध्ये मध्यंतरी जो पाऊस पडला. ते अघोषित वादळ असल्या सारखं होत. सोसाट्याचा वारा होता. दक्षिण मुंबईत जो पाऊस पडला तो ३०-३५ वर्षात त्या विभागात एवढा पडला नव्हता. असे हे विचित्र झालेले पर्जन्यमान त्यात आलेले कोविडचे संकट, अपुऱ्या पडत असलेल्या आरोग्य सुविधा, कोविड विरोधात लस किंवा औषध नाही तरी देखील आपण लढत आहोत, जीव वाचवत आहोत असेही ते म्हणाले आहेत.


















