न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहामध्ये नवीन नगरसेवकांना दुजाभावाची वागणूक दिली जाते. ज्येष्ठ नगरसेवक बोलत असताना सतत ज्यूनिअर व सिनिअर असे बोलत असतात. त्यामुळे नवीन नगरसेवकांना शरमल्यासारखे होते. हा नवीन जुना भेद तुम्ही कधी संपवणार आहात? असा प्रश्न नगरसेवक अभिषेक बारणे यांनी उपस्थित केला.
सभागृहामध्ये बोलत असताना सतत नवीन नगरसेवकांकडे एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. आम्हालाही आता साडेतीन वर्ष झाले आहेत. आम्हालाही काही गोष्टी समजायला लागल्या आहेत. मात्र सततच सभागृहामध्ये नवीन -जुना असा भेद केला जातो. हे ज्येष्ठ आणि नवीन काय आहे. आम्हीही जनतेमधून निवडून आलो आहे. आम्हाला मते मांडण्याचा अधिकार आहे.
नेहमीच नवीन नगरसेवकांना ज्येष्ठ नगरसेवक नवखे म्हणत असतात. त्यामुळे सभागृहात अवघडल्यासारखे होत असल्याचे नगरसेवक बारणे यांनी सांगितले. तर बाळासाहेब ओव्हाळ म्हणाले, हे सतत नवीन नवीन काय आहे. आता साडेतीन वर्ष झाले. अजून किती दिवस असे चालणार?


















