न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) रोजी ११०५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात निगडी (पुरुष ८४ वर्षे), भोसरी (पुरुष ५४ वर्षे, स्त्री ६८ वर्षे), पिंपरी (पुरुष ८३ वर्षे), रावेत (पुरुष ६५ वर्षे), मोशी (स्त्री ६५ वर्षे), तळेगाव (पुरुष ५६ वर्षे), सांगवी (स्त्री ५४ वर्षे, पुरुष ७२ वर्षे, पुरुष ७९ वर्षे), दापोडी (पुरुष ८३ वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ४५५१० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ८५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३१८६३ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















