- गणेशोत्सवाचा खर्च टाळून आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराद्वारे दिला सामाजिक संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑगस्ट. २०२०) :- श्री साई युवा मंच व मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव व दशकपुर्ती सोहळ्यानिमित्ताने आज कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत, सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून, गुरूवार (दि. २७) रोजी मोफत आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जाधववाडी चिखली येथील कै. सोपान रामभाऊ जाधव चौक, साई पॅलेस. येथे सकाळी ९ ते साय.६ वा. दरम्यान हे शिबिर पार पडले. या वेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
कार्यक्रमांची सुरूवात माजी महापौर राहुलदादा जाधव, राहुल गरड, मारूती घोलप, राजूशेठ भुजबळ यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.
यावेळी हिमोग्लोबिन टेस्ट, ब्लडप्रेशर, डेंगू, हिपॅटायटीस, मलेरिया, आणि एच.आय.व्ही.आदी रोगांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच मोरया रक्तपेढी चिंचवड यांच्या सौजन्याने १०१ महिला व पुरुषांचे रक्त संकलित केले. संकलित केलेले रक्त काेरोनाच्या काळात उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येक रक्तदात्याला नाष्टा, टी-शर्ट, प्रशस्तिपत्र तसेच रक्तदात्यास लाईफ टाईम ब्लड सेव्हिंग कार्ड दिले. यावेळी मंडाळाचे सभासद महादु जाधव, रमेश निकम,दत्तात्रय मुळेराजू सिंग,कविता निकम,ज्योत्स्ना ढोबळे, पायल डुकरे, सायली चिखले,नितिन यंगड,विजय यंग ड, मधुकर नलगे, यांनी संयोजन केले.














