न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑगस्ट. २०२०) :- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपये दंड करण्याचा मानस असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सूचक वक्तव्य केलं आहे.
याद्वारे करोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक असल्याचे सांगितले. पिंपरी येथे कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आजही महाराष्ट्रात काही ठिकाणी नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर आता जर पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात मास्क वापरला नाहीतर एक हजार रुपये दंड आकारण्याचा विचार सुरू आहे. त्याशिवाय नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत नाही. सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे. फिजिकल डिस्टसिंग ठेवलेच पाहिजे. हे सर्व नियम नागरिकांनी कटाक्षाने पळाले पाहिजेत, असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवले.














